मुळशीत अखेरच्या दिवशी फाँर्म भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी   

मुळशीत अखेरच्या दिवशी फाँर्म भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी   

भुकूम : मुळशी तालुक्यात ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या दिवशी महिलांचीही मोठी गर्दी झाली होती. आँफलाईन अर्ज स्विकारल्यामुळे गर्दीत भर पडली होती. अर्ज स्विकारण्यास वेळ लागत असल्यामुळे विश्रांतीसाठी मिळेल त्या जागेचा आश्रय घेतला जात होता.

तालुक्यातील कासारअंबोली येथील सैनिक शाळेत सकाळी साडेदहा पासून उमेदवारांची गर्दी झाली होती. तालुक्यातील भुकूम, घोटावडे, माण, हिंजवडी, जांबे, माारूंजी, कासारसाई दूरवरील ग्रामपंचायतीचे इच्छुक उमेदवार सकाळी लवकर आले होते.

आँफ लाईनमुळे  अर्ज तपासणीस वेळ लागत होता. त्यामुळे उभे राहून कंटाळल्यामुळे महिलांनी एका ठिकाणी बैठक मारली. पुरूषांपैकी अनेकजण बाहेरील झाडाखाली थांबले होते. शाळेच्या परिसरात कोणतेही हाँटेल नसल्यामुळे कार्यकर्ते बाहेरून पाणी व वडा पाव आणून वाटत होते. अनेक उमेदवार गंद, टोपी घालून कार्यकर्त्यांसह अर्ज भरायला आले होते. महिला खास सजून आल्या होत्या व आपला अर्ज भरत होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान आँफ लाईन अर्ज स्विकृतीमुळे गर्दी वाढल्यामुळे तसेच उशीर होत असल्यामुळे अर्ज स्विकृतीची वेळ तीन वरून साडेपाच करण्यात आल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला. तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी कमी गर्दी होती. पूर्व भागातील ग्रामपंचायतीच्या टेबल पुढे रांगा लागल्या होत्या. दरम्यान मंगळवार पेक्षा गर्दी कमी होती.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com