
माळशिरस : एरवी सर्वसाधारण ग्रामसभा किंवा महत्त्वाच्या विषयावर ती विशेष ग्रामसभा म्हटले की क्वचितप्रसंगी ग्रामसभेसाठी आवश्यक गणपूर्ती होत असे; अन्यथा अनेक वेळा गणपूर्ती अभावी ग्रामसभा तहकूब करून परत घ्यावी लागत असत आज मात्र माळशिरस येथे वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
ग्रामसभेसाठी लांबच्या लांब रांगा लागून तीन तासांची मुदत संपूनही त्यानंतरही ग्रामसभेच्या निश्चित जागेच्या बाहेर रांगेत मोठ्या प्रमाणावरती उभे राहून आपला ग्रामसभेसाठी मतदानाचा हक्क बजावताना उस्फूर्तपणे नागरिक पाहावयास मिळाले. ग्रामसभेचे घटनेने घालून दिलेले महत्व आज यानिमित्ताने पाहावयास मिळाले.
माळशिरस येथील सरपंच महादेव बोरावके यांच्यावरती विरोधी माजी सरपंच अरुण यादव गटातील ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाची ग्रामसभेतून मान्यता घेण्यासाठी आयोजित विशेष ग्रामसभेसाठी ग्रामस्थांची असणारी मोठ्या प्रमाणात उपस्थिती घटनेतील ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित करून गेली. ग्रामसभेसाठी निवडणूक आयोगाकडून सकाळी 11 ते दुपारी दोन ही वेळ निर्धारित करून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रांगणामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव वरती जनमता आजमवन्याचे निश्चित केले होते.
ग्रामसभेसाठी सकाळपासूनच गावातील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी जोरात बांधणी केलेली असल्याने मतदारांनी मोठ्या प्रमाणावर ती शाळेतील प्रांगणामध्ये गर्दी केली होती. अकरा वाजता प्रत्यक्षात जनमत घेण्यास सुरुवात झाल्यानंतर शाळेतील संपूर्ण प्रांगणामध्ये नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ असल्याने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नागरिकांनी दोनच्या अगोदरच रांगेमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने प्रांगणाच्या बाहेर देखील लांबपर्यंत मतदारांच्या रांगा लागली होती.
यामुळेच मतदानासाठीची निर्धारित केलेली दोनची वेळ संपूनही त्यानंतर चार वाजले तरी देखील मतदान चालू होते. त्यामुळे नागरिकांचा विशेष ग्रामसभेत उस्फूर्त प्रतिसाद आज प्रामुख्याने दिसून आला. ग्रामसभेत अनेक वेळा पुरेशी गणसंख्या नसल्याने ग्रामसभा तहकूब करून परत द्यावी लागतात असे अनेकदा पाहावयास मिळले.
कुठल्यातरी विषयावर ती ठराविक लोकांनीच बोलणं आणि काहींनी आवर्जून विरोध करणे अशा पद्धतीच्या ग्रामसभा अनेक वेळा पहावयास मिळतात मात्र आपल्या गावचा कारभारी कोण रहावं, जो आहे तोच ठेवायचा की बदलायचा याचा फैसला करण्यासाठी ग्रामसभेतील आपली उपस्थिती महत्त्वपूर्ण असल्याने नागरिकांनी ग्रामसभेसाठी मोठ्या प्रमाणावर ती गर्दी केली. यामुळे मोठ्या प्रमाणावर ती झालेले हे मतदान कुठल्या गटासाठी तारक ठरते हे रात्री मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.