बाप रे, पुण्यातील या तालुक्यात दर पाऊण तासाला कोरोनाचा एक रुग्ण 

श्रीकृष्ण नेवसे
Tuesday, 4 August 2020

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील लाॅकडाउन आठवड्यात बर्‍यापैकी शिथील झाला आणि शहरातील रुग्ण संख्येने आज 14 पर्यंत उसळी खाल्ली. त्यातून एकटे सासवड शहर आजअखेर 281 वर पोचले. तर, संपूर्ण पुरंदर तालुक्यात आज तब्बल 33 रुग्णांसह तालुका सहा शतकाच्या उंबरठ्यावर म्हणजेच 597 वर पोचला. 

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील लाॅकडाउन आठवड्यात बर्‍यापैकी शिथील झाला आणि शहरातील रुग्ण संख्येने आज 14 पर्यंत उसळी खाल्ली. त्यातून एकटे सासवड शहर आजअखेर 281 वर पोचले. तर, संपूर्ण पुरंदर तालुक्यात आज तब्बल 33 रुग्णांसह तालुका सहा शतकाच्या उंबरठ्यावर म्हणजेच 597 वर पोचला. 

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

पुरंदर तालुक्यात कालच्या चोवीस तासात कोरोनाचे 26 रुग्ण वाढले होते. आज 33 वाढले. केवळ 48 तासात 59 रुग्ण वाढलेत. सरासरी दर पाऊण तासाला एक रुग्ण येथे बाधीत होतोय. शहरी भागात व ग्रामीण भागातही काळजी आणि चिंता वाढली आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

आज सासवडला 14, वाल्हे येथे आठ, जेजुरी व नीरा प्रत्येकी तीन आणि पारगाव, भिवरी, बोपगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला. तालुक्यातील तब्बल 55 गावे कोरोनाबाधीत झाली आहेत. एकुणच कोरोनामुक्ती येथे सध्या खुप दूर गेली असून, बाधीत वा त्यांची संख्या आवरणे कठीण झाले आहे. शिस्त पाळण्याबाबत काही लोक कमालीचे दुर्लक्ष करतात; त्यातून हे हाल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large increase in the number of corona patients in Purandar taluka