
फळ बाजारात काश्मीरच्या सफरचंदाचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डात सध्या कश्मिरचे सफरचंद मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दर स्थिर आहेत. सध्या दररोज ३०००-३३०० पेटींची आवक होत आहे.
मार्केट यार्ड (पुणे) : फळ बाजारात काश्मीरच्या सफरचंदाचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डात सध्या काश्मीरचे सफरचंद मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दर स्थिर आहेत. सध्या दररोज ३०००-३३०० पेटींची आवक होत आहे.
पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!
हळू हळू सफरचंदाची अवाक वाढत जाईल. परंतु यंदा दर्जा नसल्याने व्यापारी माल मागविण्यास तयार नाहीत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अवाक कमीच आहे. सध्या बाजारात काश्मीर सफरचंदाच्या १५ किलोच्या पेटीस दर्जानुसार ७०० ते १२०० रूपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे व्यापारी करण जाधव यांनी दिली. तर किरकोळ बाजारात किरकोळ बाजारात १०० ते १५० रूपये किलो या दराने विक्री केली जात आहे.
वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी
जाधव म्हणाले, सुमारे सप्टेंबर पासून हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची आवक सुरू आहे. हा सफरचंदाचा हंगाम दिवाळी पर्यंत असतो. यंदा उत्पादन फारच कमी आहे. बागेतील ७० टक्के सफरचंदाला बर्फाचा मारा बसला आहे. तर, ३० टक्के चांगले सफरचंद आहेत. त्यामुळे बाजारात ही यंदा सफरचंदाचा अजूनही म्हणावा तसा उठाव नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काश्मीरभागात यंदा मोठा प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदा सफरचंदाचा दर्जा म्हणावा तसा नाही. मागील वर्षी यावेळत दररोज साधारणतः १० गाड्यांची आवक होती. ती यंदा फक्त ३ गाड्यांची अवाक आहे.
- करण जाधव, व्यापारी, मार्केट यार्ड.
हिमाचल सफरचंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात
यंदा शिमला येथील सफरचंदाचा हंगाम खूपच चांगला झाला आहे. त्या मालाचा दर्जाही उत्तम आहे. हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.