esakal | पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_University

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या नियमित आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १२ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहे.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १२ ऑक्टोबरपासून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, सक्षम विषयामुळे किंवा इतर कारणांमुळे एकाच वेळी विद्यापीठाच्या दोन विषयांच्या परीक्षा आल्यास, सीईटी परीक्षा किंवा अन्य स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी असल्यास किंवा विद्यार्थ्याना कोरोनाची बाधा झाल्यास अशा काही कारणांमुळे परीक्षा देणे अशक्य झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत विद्यापीठातर्फे विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन​

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही कारणास्तव परीक्षा देणे शक्य न झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा नजीकच्या काळात परीक्षा देता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या नियमित आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १२ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती त्यांच्या स्टुडन्ट एक्झाम फॉर्म प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते​

एकाच वेळी दोन परीक्षा आल्यास किंवा विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली असल्यास विशेष परीक्षेस बसण्याची परवानगी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्राच्या प्रती महाविद्यालयांमध्ये किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्य, संचालकांना मार्फत परीक्षा समन्वय कक्षात सादर करणे आवश्यक आहे.

"कोणत्याही कारणास्तव परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेत संधी दिली जाईल. अंतिम वर्षाची मुख्य परीक्षा झाल्यानंतर ही विशेष परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया परीक्षेपूर्वी दहा-बारा दिवस आधी सुरू करण्यात येईल."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top