pune dahi handi laser light
sakal
पुणे - सण-उत्सवात येथून पुढे ‘डीजे’ चा आवाज वाढणार नाही तसेच लेझर लाईटचा वापर होणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी मंडळांना बजावले असले तरी दहीहंडी उत्सवात त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. खासकरून लेझर लाईटचा वापरही वाढलेला दिसून आला. यावरून गदारोळ सुरू असताना उत्सवकाळात वापरल्या जाणाऱ्या डोळे दिपवणाऱ्या ‘लेझर लाईट’मुळे नागरिकांच्या दृष्टीचे कायमचे नुकसान होऊ शकते. प्रसंगी दृष्टीही जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.