लज्जतदार खाद्यपदार्थ खरेदीची संधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे - मनसोक्त खरेदी अन्‌ खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी "सकाळ फर्निचर आणि कंझ्युमर एक्‍स्पो'ला रविवारी गर्दी केली. अनेकांनी गृहोपयोगी वस्तूंपासून ते डिझायनर फर्निचरपर्यंतच्या वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. खाद्यजत्रेत पदार्थांमधील वैविध्यता खवय्यांना पाहायला मिळाली. गुजराथी खाकरा- ढोकळापासून ते "रेडी टू इट' स्वरूपातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करता आले. सोमवारी (ता. 22) एक्‍स्पोचा शेवटचा दिवस असून, चविष्ट आणि लज्जतदार खाद्यपदार्थ खवय्यांना खरेदी करता येतील. तर फर्निचर, गृहसजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, कपड्यांसह ऑटोमोबाईल कंपन्यांनी सादर केलेल्या कारचे मॉडेल्सही पाहता येतील. 

दोनशेहून अधिक स्टॉल्समध्ये देशभरातील कंपन्यांची दहा हजारांहून अधिक उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थांमध्ये राजस्थानी, गुजराथी मिठायांसह फराळाचे विविध प्रकार पाहता येतील. पटकन तयार होणारे "रेडी टू इट' स्वरूपातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ प्रदर्शनात खरेदी करता येतील. यामध्ये उपमा, इडली, पावभाजी, भाजणी आणि रवा यांच्या तयार पिठाच्या जोडीला मसाले, सुपमधील विविध व्हरायटीही पाहता येतील. फराळ, ड्रायफ्रूट्‌स, मिठाई आणि चिक्कीचा गोडवाही नागरिकांना चाखता येणार आहे. लज्जतदार, खमंग आणि गोड अशा चवीतील खाद्यपदार्थांची रेलचेल येथे दिसून येईल. सूप, आवळा कॅंडी, सोप, सुपारी व पानही खवय्यांसाठी आहे. यासोबतच विविध प्रकारचे ज्यूस, जलजिरा अशी पेयेही आहेत. 

खाद्यपदार्थांच्या जोडीला नावीन्यपूर्ण आणि डिझायनर फर्निचरही खरेदी करता येईल. गृहोपयोगी वस्तूंमध्ये व्हरायटी पाहता येईल. तर पेंटिंग, म्युरल्स, वॉल हॅंगिंग, फुलदाण्या या गृहसजावटीच्या वस्तूंबरोबर गाद्या, बेडशिट्‌स आणि कुशन्सही आहेत. या एक्‍स्पोत गॅस शेगड्यांपासून चिमणीजपर्यंत, मसाल्यांपासून ते मिक्‍सरपर्यंत, घरगुती उपकरणांपासून ते किचन गॅजेट्‌सपर्यंतच्या वस्तू खरेदी करता येतील. फॅशनेबल कपड्यांपासून फॅन्सी फुटवेअर्स, ज्वेलरीपर्यंत आणि फर्निचरपासून ते फर्निशिंगपर्यंतच्या विविध वस्तू पाहायला मिळणार आहेत. 

एक्‍स्पोविषयी माहिती... 
कालावधी - सोमवारपर्यंत (ता. 22) 
कुठे - पंडित फार्म्स, कर्वेनगर परिसर 
केव्हा - सकाळी अकरा ते रात्री नऊ 
प्रवेश शुल्क - दहा रुपये 
(टीप - सकाळ- मधुरांगण सभासदांना ओळखपत्र दाखवून प्रवेश विनामूल्य.) 
सुविधा - वाहनतळ विनामूल्य 

Web Title: Last day sakal furniture and consumer expo