01Pune_University_0.jpg
01Pune_University_0.jpg

#SPPU मुलींच्या नवीन वसतिगृहाचे काम गेल्या पाच वर्षापासून प्रलबिंत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या नवीन वसतिगृहाचे २०१४ पासून रखडलेल्या काम सुरू झाले आहे. विद्यापीठातील प्रलंबित बांधकामाबाबत अधिसभेत हा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी मुलींच्या नविन वसतिगृहाचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.

या वसतिगृहाचे भूमिपूजन फेब्रुवारी २०१४मध्ये करण्यात आले. त्यानंतर हे बांधकाम २०१५ पर्यत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम न झाल्याने या कामाला दोन वर्षाची मुदत वाढ देण्यात आली. तरी देखील ऑक्टोबर २०१८ पर्यंत या कामाला मुहूर्त लागला नाही. 

अधिसभेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर म्हणाल्या, "जवळपास २०० विद्यार्थिनी संख्या असणाऱ्या या वसतिगृहाच्या उभारणीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने सुमारे एक कोटी वीस लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र अद्याप वसतिगृह प्रत्यक्षात न आल्याने ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या गरजु विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे."

त्याचप्रमाणे ७०० आसन क्षमता असलेल्या समाजशास्त्र सभागृह २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण हे सभागृह साकारण्यात आलेले नाही, असा प्रश्न अधिसभा सदस्य अभिषेक बोके यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "या सभागृहाचे काम २०११ मध्ये सुरु झाले असून त्याला २०१७ पर्यंत मुदत वाढ दिली होती. आतापर्यंत चार कोटी रुपये खर्च करूनही अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही."

प्रशासकिय अधिकारी, वास्तुविशारद, अभियंता यांच्यात संवादाचा अभाव आहे. त्यामुळे विद्यापीठाने पुढील काळात यात सुसंवाद घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी चर्चा अधिसभेच्या सदस्यांनी केली.

"मुलीच्या नवीन वसतिगृहाचे काम या आठवड्यात सुरु केले आहे. लवकरात लवकर वसतिगृहात काम पूर्ण केले जाईल. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आलेला निधी परत जाऊ देणार नाही" 
- डॉ. नितिन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com