तिघांच्या आयुष्यातली अखेरची ट्रीप; अपघातापुर्वी काढलेला घट्ट मैत्रीचा फोटो ठरला शेवटचा

last Photo of Three boys from pune who Died in accident near karad
last Photo of Three boys from pune who Died in accident near karad
Updated on

कात्रज (ता. ०१) : सात जणांनी एकसोबत एकमेकांच्या गळ्यात हात घालुन काढलेला तो फोटो त्यांच्यातील तिघांसाठी आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला. पुण्यातील कात्रज परिसरातील कराडजवळ झालेल्या अपघातात कात्रज परिसरातील तिघांचा मृत्यू झाला आणि तिघेजण जखमी झाले. या घटनेमुळे कात्रजकरांवर शोककळा पसरली. अपघातात रविराज साळुंखे (वय ३०), राहुल दोरगे (वय २८), स्वप्नील शिंदे (वय ३१) तिघेही रा. कात्रज या तिघांचा मृत्यू झाला. विविध भागातून व्यवसायासाठी कात्रज परिसरात एकत्र आलेले हे सर्व मित्र सोबत बाहेर पडले आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांची ही शेवटचीच ट्रीप ठरली.

स्वप्नील शिंदे मूळ राहणार सातारा जिल्ह्यातील फलटणमधील असून कात्रज परिसरात ते इलेक्ट्रिकची कामे करत होते. राहुल दोरगे हा मूळ पुणे जिल्ह्यातील यवतमधील असून ते कात्रज परिसरात बांधकाम व्यवसायात कार्यरत होते. रविराज साळुंखे हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्यांचा याच परिसरात टेंपोचा व्यवसाय होता. तिघांवरही काळाने घाला घातला. 

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

कु. तुषार गावडे (वय २५) हे मामासाहेब मोहोळ कुस्तीसंकुलाचे पैलवान आहेत. पै. गणेश काळे (वय २९) हे कात्रज जवळील गुजर-निंबाळकरवाडी गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे कात्रज वंडरसिटी येथे गोरक्षनाथ बॅटरी नावाने एक्साईड बॅटरी नावाने शॉप आहे. बाळासाहेब गदळे (वय २९) मूळ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील असून त्यांचा कात्रज वंडरसिटी येथे टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. सत्यज्योत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून हे सर्व कात्रज परिसरात एकत्र बांधले गेलेले होते. हे तिघेही जखमी आहेत. यापैकी गणेश काळे आणि बाळासाहेब गदळे यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे तर तुषार गावडे यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचार सुरु आहेत.

अपघाताआधी त्यांनी कोल्हापूरमधील अंबाबाई महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन ते पुण्याकडे रवाना होत होत होते. त्याचवेळी कराडजवळ पोहोचत असताना कोल्हापूरच्या बाजूला तीन किमी अतंरावर पुणे-बंगळुरु महामार्गावरील पाचवड फाटा ते आटके टप्पा परिसरात काल (ता. ३१) हा अपघात झाला.

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

सायंकाळी पावणे आठच्या सुमारास इनोव्हा व स्विफ्ट कार एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना स्विफ्ट कारने ठोकर दिल्याने इनोव्हा कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्या पाठोपाठ स्वीफ्ट कारही त्यावर आदळली. यासोबतच या अपघातात स्विफ्टमधील चंद्रकांत कावरे (वय ७६), पूजा ओंबासे (वय ४०) भरत ओंबासे (४५), सेजल ओंबासे (वय १८) हे सुद्धा जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com