Last Shravan Somvar 2023 : मंचर येथे पांडवकालीन तमनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

‘जय भोले’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला
Last Shravan Somvar 2023 devotee at Pandava-era Tamneshwar Temple Manchar
Last Shravan Somvar 2023 devotee at Pandava-era Tamneshwar Temple MancharSakal

मंचर : येथील पांडवकालीन पुरातन काळातील तपनेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी (ता.११) २५ हजार हून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी अमरनाथ सेवा संघाच्या वतीने फराळ, पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सुर्यकांत बाबा धायबर, अध्यक्ष दिलीप महाजन, अजित बेंडे ,सुनील पोखरकर, पंडित माशेरे यांच्या हस्ते मानाचा अभिषेक करण्यात आला. पौराहित्य शिवप्रसाद राजगुरू व संतोष त्रिवेदी यांनी केले. मंदिर परिसराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

‘जय भोले’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व विकास बाणखेले याच्या हस्ते मोफत चहा, खिचडी, खजूर, केळीचे व दुधाची व्यवस्था भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांच्या वतीने करण्यात आली.गणपतराव क्षीरसागर, अवधूत शेटे, इंद्रजीत पवार, शिल्पा बनबेरू, यांनी व्यवस्था पाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com