पुण्यात गेल्या सहा महिन्यांत 334 महिलांना 'भरोसा; कौटुंबिक हिंसाचारच्या 'एवढ्या' तक्रारी दाखल

In the last six months 334 complaints of women have been resolved through the Bharosa cell
In the last six months 334 complaints of women have been resolved through the Bharosa cell

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसह पुरुषांवरील अन्याय दूर करत त्यांना वैद्यकीय सेवा आणि विधी विषयक माहिती पुरवत गेल्या सहा महिन्यात महिला सहाय्यक कक्षामार्फत (भरोसा सेल) 334 तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पती किंवा सासरचे सासुरवास करतात, पती नांदवत नाही, तसेच पत्नी किंवा तिच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या 792 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्यातून तात्काळ दिलासा मिळावा यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत कक्षाचे कामकाज चालते. कक्षांतर्गत पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवा तक्रारदारांना पुरवण्यात येतात. 

पत्नी व तिच्या घरच्यांनी त्रास दिल्याचा 160 तक्रारी :
कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिला बळी पडत नसून पुरुषांना देखील पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून अखेरीस आशा 160 तक्रारी दाखल झाल्या आहेत. शुल्लक कारणांवरून बोलणे, अवास्तव अपेक्षा बाळगणे, पतीच्या घरच्यावरून वाद करणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे.

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

'भरोसा सेल'च्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना त्यांच्या तक्रारीबाबत समुपदेशकांच्या माध्यमातून मदत केली. महिला सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीचे तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील किरकोळ वाद मिटावे हा यामागील प्रमुख हेतू असतो. जानेवारी ते जून अखेरीस कक्षात 792 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 334 प्रकरणे मार्गी लावण्यात आले आहेत.''
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

दाखल व निकाली तक्रारींची आकडेवारी : 
महिना       दाखल तक्रारी           निकाली तक्रारी

जानेवारी        302                         176
फेब्रुवारी        223                           97
मार्च             193                           39
एप्रिल             20                            11
मे                  19                            02
जून                35                            09
एकूण           792                          334


नेमकी तक्रार व त्याची आकडेवारी : 
त्रासाचे स्वरूप                                 दाखल
- पतीकडून झालेला त्रास                      277
- पत्नीकडून झालेला त्रास                      128
- सासरच्या माणसांकडून त्रास                79
- पती व सासरच्यांनी दिलेला त्रास          166
- पत्नी नांदायला येण्याबाबत                    30
- पती नांदवत नसल्याबाबत                     26
- पत्नी व तिच्या घरातील 
व्यक्तीकडून झालेल्या त्रास                     32           
इतर                                                     54


येथे मागता येते  मदत : 
अन्याय झालेली व्यक्ती पोलिस आयुक्त कार्यालयात कर्ज करू शकता. तसेच पुढील हेल्पलाइनवर त्यांना योग्य ती मदत केली जाते.
महिला हेल्पलाईन नंबर - 1091
कक्षाचा नंबर -  020 - 26125252

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com