भिगवणच्या सरपंचपदी लता चोपडे यांची निवड

प्रा. प्रशांत चवरे
सोमवार, 23 जुलै 2018

भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमाताई पद्माकर माडगे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त होते. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन पाच उमेदवार इच्छुक असल्यामुळे पक्षासमोर पेच होता. अखेर, पक्षातर्फे लता रामहारी चोपडे यांचे नांव निश्चित करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी एम.एस. तांबडे यांचे अध्यक्षतेखाली सरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली. अर्ज करण्याच्या निर्धारीत वेळेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन लता रामहारी चोपडे व अनिता संतोष धवडे यांनी तर कॉंग्रेसकडुन मुमताज जावेद शेख यांचे अर्ज दाखल केले.

भिगवण- भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमाताई पद्माकर माडगे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त होते. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन पाच उमेदवार इच्छुक असल्यामुळे पक्षासमोर पेच होता. अखेर, पक्षातर्फे लता रामहारी चोपडे यांचे नांव निश्चित करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी एम.एस. तांबडे यांचे अध्यक्षतेखाली सरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली. अर्ज करण्याच्या निर्धारीत वेळेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन लता रामहारी चोपडे व अनिता संतोष धवडे यांनी तर कॉंग्रेसकडुन मुमताज जावेद शेख यांचे अर्ज दाखल केले.

त्यानंतर, अनिता धवडे यांनी अर्ज मागे घेतला. सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेद्वार लता चोपडे या दहा मते मिळवुन विजयी झाल्या. कॉग्रेसच्या उमेद्वार मुमताज शेख यांना सहा मते मिळाली तर राष्ट्रवादीचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. कॉंग्रेसकडे केवळ चार सदस्य असताना कॉंग्रेसच्या उमेद्वारास सहा मते मिळाल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का देण्यात कॉंग्रेस यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.

यावेळी, माजी सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच जयदीप जाधव, अॅंड. महेश देवकाते, माजी सरपंच प्रशांत शेलार, माजी उपसरपंच शंकरराव गायकवाड, प्रदीप वाकसे, दत्तात्रय पाचांगणे, विक्रम शेलार व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीचे नियोजन ग्रामसेवक भिमराव भागवत, गावकामगार तलाठी डी.के. गाडेकर यांनी केले.

Web Title: Lata Chopade selected as a bhigwan Sarpanch