CNG Rates Hike: पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री ! CNG च्या दरामध्ये पुन्हा वाढ, काय आहे कारण?

CNG Rates Updates: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलो 1.10 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली.
CNG Rates In Pune
CNG Rates In Pune Esakal
Updated on

पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे, कारण, CNGच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलकडून सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो इतकी दरवाढ करण्यात आली आहे. सी एन जी साठी आता नवीन किंमत 89 रुपये प्रति किलो इतकी राहणार आहे. याआधी सीएनजीचा दर 87.90 प्रति किलो इतकी होता. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर 89 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम असल्याचे सांगितले जातं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com