‘महाराष्ट्र नॅचरल’चा सीएनजी गॅस महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

latest news Maharashtra Natural CNG gas Price hike by Rs 3 per kg pune

‘महाराष्ट्र नॅचरल’चा सीएनजी गॅस महागला

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) या वाहनांसाठी लागणाऱ्या गॅस दरात प्रति किलो तीन रुपयांनी दरवाढ केली आहे. ही नवी दरवाढ बुधवारी (ता.६) मध्यरात्रीपासून लागू केली जाणार आहे. यामुळे वाहनधारकांना आता महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या सीएनजीसाठी प्रति किलोला ८५ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या भागात लागू करण्यात आली आहे. सध्या प्रति किलो ८२ रुपयांनी हा सीएनजी गॅस मिळत असे.

देशी नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्यामुळे ही वाढ केल्याचा दावा एमएनजीएल कंपनीने केला आहे. सीएनजी आणि पाइपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या स्वयंपाकासाठीच्या घरगुती गॅसमध्ये म्हणजेच पीएनजी क्षेत्रातील देशी नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता पूर्ण करण्यासाठी री-गॅसिफाइड लिक्विफाईड नॅचरल गॅस (आर-एलएनजी) मिश्रित केला जातो. या संयोजनामुळे एम्एनजीएलद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या दरवाढीनंतरही एम्एनजीएलच्या सीएनजी गॅसमुळे चारचाकी वाहनांसाठीच्या इंधन खर्चात अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे सुमारे ५३ टक्के आणि ३२ टक्के बचत होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Web Title: Latest News Maharashtra Natural Cng Gas Price Hike By Rs 3 Per Kg Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..