

लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निकालानंतर सोमवारी जल्लोष करताना सहकार पॅनलचे प्रमुख माजी आमदार धीरज देशमुख व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव.
लातूर जिल्हा बँकेवर
सहकार पॅनलचे वर्चस्व
--
दिलीप देशमुख, बाबासाहेब पाटील यांचीच सरशी; प्रतिस्पर्ध्यांना चार जागा
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १६ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाळीस वर्षांपासून माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यात आहे. १९ संचालक मंडळांसाठी झालेल्या निवडणुकीतही १५ जागा जिंकत देशमुख व पाटील यांच्या सहकार पॅनेलने वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार रमेश कराड यांच्या पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. पण, या निवडणुकीनिमित्ताने निलंगेकर व कराड यांचा बँकेच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.
बँकेतील सत्ताधारी देशमुख व सहकारमंत्री पाटील यांनी सहकार पॅनल तयार केले होते. तर त्यांना आव्हान देण्यासाठी आमदार निलंगेकर, बनसोडे, कराड यांनी छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल तयार केले होते. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात चार जागा बिनविरोध आल्याने सहकार पॅनेलने एक प्रकारे आघाडी घेतली होती. या बँकेच्या पंधरा जागांसाठी रविवारी (ता. १५) मतदान झाले होते. ९९९ पैकी ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ९९.४० टक्के मतदान झाले होते. सोमवारी (ता. १६) मतमोजणी झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी निकाल जाहीर केले. पंधरापैकी ११ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर परिवर्तन पॅनेलचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.