नसरापुरातील हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेची सुरुवात

किरण भदे
Sunday, 27 September 2020

 भोर तालुक्‍यात नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते रुग्णालयात योजनेची सुरुवात करण्यात आली.

नसरापूर (पुणे) : भोर तालुक्‍यात नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते रुग्णालयात योजनेची सुरुवात करण्यात आली. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती लहूनाना शेलार, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, डॉ. राजेंद्र डिंबळे, डॉ. सचिन घाडगे, डॉ. जगदीश फरांडे, डॉ. सविता डिंबळे, गौरव बागमार उपस्थित होते. 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

रणजित शिवतरे म्हणाले, ""जनआरोग्य योजनेचा पुणे जिल्ह्यातील कोटा पूर्ण झाल्याने भोर तालुक्‍याला योजनेचा लाभ घेता येत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बाब म्हणून या योजनेची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती.'' डॉ. डिंबळे यांनी योजनेबाबत माहिती दिली. तालुक्‍यातील एकमेव रुग्णालयात ही योजना असल्याने जास्ती जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. लहूनाना शेलार यांनी रणजित शिवतरे यांचे आभार मानले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of Janaarogya Yojana at Nasrapur Hospital