गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ

पराग जगताप
बुधवार, 25 एप्रिल 2018

परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार असुन सुपिक माती देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढणार असल्याचे मत तहसीलदार काकडे यांनी व्यक्त केले. 

उदापूर (ता. जुन्नर) - येथील शिंदे वस्तीतील पझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ  तहसीलदार किरण काकडे यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आला. 

अनुगामी लोकराज्य महाअभियान व डिसेंन्ट फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील सात तलावातील गाळ काढण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार असुन सुपिक माती देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढणार असल्याचे मत तहसीलदार काकडे यांनी व्यक्त केले. 

यावेळी अनुलोम चे उपविभाग जनसेवक संतोष पाटील, जुन्नर जनसेवक राहूल दातखिळे, डिसेंन्ट फाऊंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजकुमार मुके, उदापूर चे माजी सरपंच बबनराव कुलवडे, उदापूर वस्तीमित्र धनंजय बुगदे, संकेत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विनोद भोर,मोहन वल्हवणकर, जयवंत डोके, पत्रकार पराग जगताप, विकास ताम्हाणे, अशोक वऱ्हाडी, रामचंद्र काळे व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Launch of the MudFree Damage Sludge Shivar Abhiyan