लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द

यशपाल सोनकांबळे
मंगळवार, 23 मे 2017

पीएमआरडीएला बांधकाम आणि नियंत्रणाचे अधिकार, राज्यसरकारचा निर्णय

पुणे : राज्यसरकारने लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा मंगळवारी रद्द केला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला बांधकाम आणि नियंत्रणाचे अधिकार देण्यात येणार आहे.

या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आायुक्त किरण गिते म्हणाले, "लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द झाला असल्याचे कळाले आहे. परंतु या संदर्भात अद्याप अध्यादेश काढलेला नाही. राज्यसरकारकडून काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. लवासाच्या उपलब्ध रेकॉर्डविषयी माहिती घेण्यात येईल. तसेच पीएमआारडीएच्या माध्यमातुन पुढील विकासकामे केली जातील. "

Web Title: lavasa's special authority status revoked