
Sachin Pathare and Bandu Khandve
ESakal
पुण्यातील वडगाव शेरी परिसरात शनिवार झालेल्या राड्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे आणि बंडू खांदवे यांच्या वादानंतर झालेल्या गोंधळात आणि धक्काबुकी प्रकरणात ‘सचिन पठारे’ नावाच्या व्यक्तीला मारहाण झाल्याची चर्चा होती. पण आता दुसऱ्याच ॲड. सचिन पठारे यांनी पुढे येत म्हटलं आहे की “मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही!”