तब्बल साडेतीन महिन्यानंतर बार रुममधील लॉकर उघडले

the lawyers chambers in Shivaji Nagar District and Sessions Courts were reopened today after lockdown
the lawyers chambers in Shivaji Nagar District and Sessions Courts were reopened today after lockdown
Updated on

पुणे : लॉकडाऊनमुळे शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांचे कक्ष (बार रुम) साडेतीन महिन्यानंतर आज (गुरुवार) उघडण्यात आले. अनेक वकिलांची महत्वाची कागदपत्रे बार रुममधील लॉकरमध्ये अडकली होती. त्यामुळे  वकिलांना ही कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी दोन तासांची मुभा देण्यात आली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्यायालयात अडकून पडलेल्या या कागदपत्रांमुळे वकिलांची कामे थांबली होती. त्यामुळे लॉकर उघडण्यास परवानगी देण्याची मागणी वकील करत होते. न्यायालयातील नवीन व जुनी इमारतीत एकुण सात बार रुम आहे. महिला आणि पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बार रुम आहेत. बार रुममध्ये वकिलांना न्यायालयीन कागदपत्रे ठेवण्यासाठी लॉकर तयार करण्यात आले. या कप्यांच्या चाव्या वकिलांकडे देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतर ते उघडण्यात आले नव्हते. मात्र न्यायालयीन कामकाजाची कागदपत्रे बार रुममध्ये अडकल्याने ते काही काळ उघडण्यात यावेत, अशी विनंती वकिलांकडून पुणे बार असोशिएशनकडे करण्यात आली होती.

शरद पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि तीन मंत्री घेऊन भेटायला आले......! 

असोसिएशनकडून याबाबत न्यायालय प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. कागदपत्रे नेण्यात आल्यानंतर नवीन इमारतीतील दोन आणि जुन्या इमारतीतील लघुवाद न्यायालयाजवळील दोन अशा चार बार रुमचे निर्जंतुकीकरण करण्यात आले, अशी माहिती अ‍ॅड. मुळीक, उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, अ‍ॅड. विकास तुपे, सचिव घन:श्याम दराडे यांनी दिली. वकिलांनी कागदपत्रे नेल्यानंतर बार रूम पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ते बंदच ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com