राजगुरूनगरची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात

राजगुरूनगरची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात

आळंदी : जागृत आणि पेशाने वकिल असलेल्या नागरिकाने राजगूरूनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि नदीप्रदुषणाच्या मांडलेल्या प्रश्नाबाबत स्थानिक पातळीवर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कंटाळून थेट पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठविले. तक्रार अर्जाची पंतप्रधान कार्यालयात तत्काळ दखल घेतली आणि राज्याचे मुख्य सचिवांना तक्रारीचे निवारण करण्याबाबत पत्र पंतप्रधान कार्यालयातून अतिरिक्त सचिव आशिशकुमार मिश्रा यांनी दिले. पंतप्रधान कार्यालयातून उलट उत्तराचा लिफाफा आक्टोबर महिन्यात तक्रार दारालाही पाठविला. मात्र टपालखात्याच्या दिरंगाईमुळे तब्बल एक महिन्यांची राजगूरूनगरला लिफाफा पोहोचला. हीही समस्या या निमित्ताने समोर आली. 

याबाबत हकिकत अशी की राजगूरूनगरमधिल पेशाने वकिल असलेल्या जी.ए.कुलकर्णी यांनी राजगूरूगनगरच्या समस्यांबाबत स्थानिक पातळीवर नगरपरिषदेला गेल्या चार वर्षात वेळोवेळी पत्रव्यवहार केला. यामधे गावच्या पाण्याचा प्रश्न केव्हा सुटणार.नदीपात्रात सांडपाणी सोडल्याने पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते.वाडा रोड खड्ड्यांचा आहे.फुटपाथ नाहीत.चौकांमधे पथदिवे नाहीत.कचरा व्यवस्थापन नाही.मोकाट कुत्री आणि डुकरांचा सुळसुळाट झाला.या समस्यांची दखल न घेतल्यास कायदेशीर नोटीस देण्यात येईल अशा आशयाचा निवेदनही अॅड जी.ए.कुलकर्णी यांनी राजगुरूनगर परिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना सप्टेंबर महिन्यात दिले होते.त्याच पत्राची एक प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवली. 

स्थानिक पातळीवर नगरपरिषदेला पाठविलेल्या समस्यांच्या तक्रार अर्जाला पालिकेने उलट उत्तर दिलेच नाही. वेळोवेळी केराची टोपली दाखवली. मात्र दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयातून ३१ आक्टोबरला  आशिशकुमार मिश्रा यांनी अॅड कुलकर्णी यांच्या पत्राची दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना या प्रश्नांची निवारण करण्याबाबत उलट पत्रव्यवहार केला. त्याची पोहोच अॅड कुलकर्णी यांना आज तब्बल एक महिन्यांनी मिळाली. टपालखात्याच्या दिरंगाईमुळे दिल्लीतील सरकारी कार्यालयातून आलेले पत्रही उशीरा पोचले. समस्या निराकारण होईल की नाही याची खात्री नाही. मात्र स्थानिक पातळीवरून दखल घेतली नाही. ती किमान पंतप्रधान कार्यालयातून उत्तर तर मिळाले हीच तक्रारदार राजगुरूनगरवासियांसाठी दिलासादायक बाब आहे.
यामुळे आता राज्य सरकार आणि स्थानिक पालिका राजगूरूनगरच्या प्रश्नांवर काय दखल घेते याची प्रतिक्षा राजगुरूनगरवासियांना आहे.

याबाबत अॅड कुलकर्णी म्हणाले, ''मी पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठवले. त्याची पोहोचपावती अद्याप मिळाली नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयातून राज्याच्या सचिवांना पाठविलेले पत्र मिळाले. शेजारील तालुके विकासात प्रगती केली. खेड तालुका मात्र समस्यांनी ग्रासला आहे. पिण्याच्या पाणी, रस्ते, कचरा समस्या, नदीप्रदुषण याबाबत आता नागरिकांनी सामूहिक आवाज उठवून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनार दबाव आणणे गरजेचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजगूरूनगरमधे करदात्याच्या प्रामाणिकपणाला किंमतच नाही.गुराढोरांप्रमाणे नागरिकांना रहावे लागत आहे. प्रगत राज्यात पाणी विकत घ्यावे लागते ही शोकांतिका आहे.आणखी किती दिवस समस्यांना कवटाळून बसावे लागणार आहे.पंतप्रधान कार्यालयातून दखल घेतली मात्र राज्य शासन काय करते हे पहावे लागेल.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com