देश असहिष्णुतेच्या मार्गाने जातोय - डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘आज आम आदमी भयभीत झाला आहे. मग काय उरले आहे आज गांधींचे? आपण गांधींची सहिष्णुता पार विसरून गेलो आहोत. अराजकता सर्वत्र पसरत चालली आहे. आपण एका झुंडीत परावर्तित होत चाललो आहोत. संवादाची संस्कृती विसरलो आहोत. बा आणि बापूंची १५० वी जयंती साजरी करताना आपला देश असहिष्णुतेच्या मार्गाने पुढे जातो, हे दुर्दैवी आहे,’’ अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत ‘गांधी आणि सहिष्णुता’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ‘‘डॉ. शंकर अभ्यंकर हे धर्माचे अभ्यासक आहेत; पण त्यांनी नसिरुद्दीन शाह आणि आमीर खान यांच्याबद्दल केलेले विधान दुर्दैवी म्हणायला हवे. विरोधाभास बघा, अभ्यंकर यांनी ज्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार घेताना नासिर आणि आमीरला देश सोडून जा, असे म्हटले, त्या अटलजींचादेखील त्यांना विसर पडला. अटलजी तर साक्षात सहिष्णुतेचे प्रतीक होते; पण अभ्यंकर यांना मात्र नासिर यांच्याबद्दल असहिष्णू विधान करावेसे वाटते, हे अतिशय दुर्दैवी आहे. अभ्यंकर, तुमच्या विचारांतच असहिष्णुता झळकते आहे.’

नसिरुद्दीन यांच्याकडून देशाची प्रतिमा उंचच !
देशमुख म्हणाले, ‘‘नसिरुद्दीन शहा एक अस्सल भारतीय आहे आणि त्याने अभिनेता म्हणून आपल्या देशाची प्रतिमा सदैव उंचच केली आहे. अशा अभिनेत्याला आपण पाकिस्तानला निघून जा म्हणतो, देश सोडून जा म्हणतो, हे दुर्दैवी आहे.’’

Web Title: Laxmikant Deshmukh Talking