esakal | पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हाती
sakal

बोलून बातमी शोधा

Laxminarayan Mishra

पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हाती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करतानाच प्रवासीकेंद्रीत सुविधा वाढविण्यावर भर असेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल,’ अशी ग्वाही पीएमपीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा (Laxminarayan Mishra) यांनी मंगळवारी दिली. (Mishra Accepted the PMP Chairmanship)

मिश्रा यांनी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडून मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास स्वीकारली. त्यानंतर ते बोलत होते. पीएमपीच्या सहव्यवस्थापक संचालक चेतना केरूरे या प्रसंगी उपस्थित होत्या. मिश्रा यांनी सूत्रे स्वीकारल्यावर लगेचच पीएमपीमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पीएमपीची वाहतूक, स्वरूप, कार्यक्षेत्र, सुरू असलेले प्रकल्प आदींची तपशीलवार माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘पुण्यासारख्या शहरात पीएमपी ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. तिचा दर्जा आणखी उंचावणे आणि प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर वाहतूक सेवा पुरविणे, हा प्राधान्यक्रम असेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.’

हेही वाचा: जागतिक न्याय दिनानिमीत्त 3KM चा 'द कॉमिक टेल्स' कार्यक्रम; सहभाग नोंदवा

मिश्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. ते मूळचे ओरिसातील असून त्यांचे शिक्षण तमिळनाडूमध्ये झाले आहे. महाराष्ट्रात त्यांची ‘आयएएस’ अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर सुरवातीला ते वाशिममध्ये ते प्रांताधिकारी होते. नगरमध्येही ही काळ त्यांची नियुक्ती होती. त्यानंतर नाशिक आणि रत्नागिरीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रत्नागिरीमध्येच ते नंतर जिल्हाधिकारी झाले. तेथून त्यांची नियुक्ती पुण्यात पीएमपीच्या अध्यक्षपदी झाली.

loading image