वक्तृत्वातूनच नेतृत्वाचा विकास होतो - डॉ. दिलीप गरूड

मिलिंद संधान
शनिवार, 28 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : "प्रभावी वक्तृत्वासाठी आत्मविश्वास, वाचन, चिंतन व रूबाबदार देहबोलीबरोबर अभियन, आरोह-अवरोह असणेही गरजेचे असते. या गुणांच्या संगमातूनच आदर्श व्यक्तीमत्व घडत असते; त्यामुळे शालेय वयातच मुलांमध्ये वक्तृत्व गुणांचा विकास होणे गरजेचे आहे." असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलिप गरूड यांनी कासारवाडी येथे मांडले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था व विद्या विकास प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत ' सर्जनात्मक विकास शिबिर ' आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शिबिरार्थींना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले.

नवी सांगवी (पुणे) : "प्रभावी वक्तृत्वासाठी आत्मविश्वास, वाचन, चिंतन व रूबाबदार देहबोलीबरोबर अभियन, आरोह-अवरोह असणेही गरजेचे असते. या गुणांच्या संगमातूनच आदर्श व्यक्तीमत्व घडत असते; त्यामुळे शालेय वयातच मुलांमध्ये वक्तृत्व गुणांचा विकास होणे गरजेचे आहे." असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलिप गरूड यांनी कासारवाडी येथे मांडले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था व विद्या विकास प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत ' सर्जनात्मक विकास शिबिर ' आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शिबिरार्थींना उद्देशून त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर शिबिराचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, मुख्याध्यापिका वंदना कोठावदे, मनिषा वेठेकर उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या शिबिरात मुकुंद तेलीचरी यांनी साने गुरूजी व चंद्रकांत पाटगावकर यांची संस्कार गीते, सतीश सुरवसे यांनी ओरिगामी ही जपानी कलेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. माधव राजगुरू यांनी शुध्दलेखनाचे नियम तर मधुकर एरंडे यांनी माझे आदर्श या विषयावर उद्बोधक व्याख्यान दिले.

डॉ गरूड म्हणाले, "शिक्षक, प्राध्यापक, वकिल, नेते, अभिनेते, विक्रेत्यांसह अनेकांना त्यांच्या व्यवसायामध्ये वक्तृत्वाची गरज पडते. वक्तृत्वामधूनच नेतृत्वाचा विकास होतो. त्यामुळे बौध्दिक दृष्ट्या सबळ होण्याकरीता वक्तृत्व नक्कीच उपयोगी पडते." सूत्रसंचलन धनश्री साळुंखे यांनी केले तर आभार कामिनी वाघ यांनी मानले.
 

Web Title: leader becomes good speaker