आपल्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर नक्की काय करायला हवे जाणून घ्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron
आपल्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर नक्की काय करायला हवे जाणून घ्या..

आपल्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर नक्की काय करायला हवे जाणून घ्या..

पुणे : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारातील विषाणूचा संसर्ग राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. संसर्गाचा दर जरी सर्वाधिक असला, तरी हा आजाराचे स्वरूप सौम्य प्रकारचे आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ, सहव्याधी किंवा दुर्धर आजार आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याला ओमिक्रॉनचा (Omicron)संसर्ग झाला तर नक्की काय करायला हवे, याचाच घेतलेला हा आढावा....

हेही वाचा: PUNE : दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाची लक्षणे जाणून घ्या..

 • खोकला, ताप, श्र्वास घ्यायला त्रास

 • सलग तीन दिवस १०० फॅरनहाइट पेक्षा जास्त ताप

 • शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी

 • छातीत दुखणे, घसा दुखणे थकवा आणि गोंधळल्यासारखे वाटने

  संक्रमाची शक्यता वाटल्यास हे करा..

 • सर्वात प्रथम स्वतः विलगीकरणात राहा

 • निदानासाठी जवळच्या केंद्रात स्वाब देऊन या

 • परिस्थिती गंभीर वाटल्यास सरकारी अथवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या

 • सकस आहार, पाणी आणि आराम करा

हेही वाचा: धक्कादायक! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

ओमिक्रॉनचे निदान झाल्यास..

 • गंभीर लक्षणे नसल्यास डॉक्टरांच्या सल्याने घरीच उपचार घ्या

 • विलगीकरणासाठी घरातच वेगळी खोली, टॉयलेट, बाथरूम गरजेचे

 • लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीने रुग्णाची देखभाल करावी

 • घरातल्यांनी तीन स्तराचे मास्क घालणे, शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरण आदी नियमांचे काटेकोर पालन करावे

 • शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर ऑक्सिमीटरच्या साह्याने लक्ष ठेवावे

 • आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास तातडीने रूग्णालयात दाखल करावे

 • रुग्णाचा आहार विहार ..

 • सकस, प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करावा

 • द्रव पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे

 • डॉक्टरांच्या सल्याने औषधे, व्यायाम आणि प्राणायाम करावे

हेही वाचा: पुणे : इंजिनिअरची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

लसीकरणाचा आपल्याला नक्की फायदा झाला आहे. त्यामुळेच ओमिक्रॉनच्या संसर्गानंतरही सौम्य लक्षणे दिसतात. मात्र यामुळे बाधित होणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणार आहे. पुढील काही आठवड्यात यामध्ये लाखांच्या पटीत वाढ होईल. अशा वेळी आरोग्य यंत्रणेवर तान येण्याची शक्यता आहे. तातडीने निदान करणे, शक्य असल्यास घरी उपचार करणे, सहव्याधी आणि गंभीर आजार असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

- डॉ. सुभाष साळुंखे, राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सल्लागार

तातडीने लसीकरण पूर्ण करणे आणि गर्दीत जाणे टाळले तर कोरोनाचा संसर्गाला आळा घालता येईल. साठ वर्षाखालील व्यक्ती जिला कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत आणि इतर आजारही नाही, अशांनी घरातच उपचार घेणे शक्य आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातही ऑक्सिजनची पातळी आणि खोकल्याच्या नोंदी ठेवाव्यात.

- डॉ. संजीव वावरे, साहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा

साधारणपणे पाच दिवसात ओमिक्रॉनचा रुग्णाची लक्षणे बरी होत आहे. त्यामुळे मास्क, शारीरीक अंतर आणि हात स्वच्छ धुण्याच्या त्रिसुत्रीबरोबरच निदान झाल्यानंतर डॉक्टरांचा योग्य सल्ला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. घाबरून न जाता समजून उमजून उपचार घ्यायला हवेत

- डॉ. अरविंद परमार, वैद्यकीय अधिकारी, कमला नेहरू रूग्णालय, पुणे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top