esakal | इंदापुरात लर्न फ्रॉम होम पॅटर्न; 11 हजार विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात 
sakal

बोलून बातमी शोधा

indapur 1.jpg

कोरोना महामारी संचारबंदी तसेच अनलॉकमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असताना देशाचे भावी नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इंदापूर पंचायत समितीने सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करत त्यांना आभासी शिक्षण दिले. त्यामुळे 378 प्राथमिक शाळेतील 11 हजार विद्यार्थी मुख्य शिक्षण प्रवाहात रमले आहेत.

इंदापुरात लर्न फ्रॉम होम पॅटर्न; 11 हजार विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात 

sakal_logo
By
संदेश शहा

इंदापूर (पुणे) : कोरोना महामारी संचारबंदी तसेच अनलॉकमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असताना देशाचे भावी नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इंदापूर पंचायत समितीने सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करत त्यांना आभासी शिक्षण दिले. त्यामुळे 378 प्राथमिक शाळेतील 11 हजार विद्यार्थी मुख्य शिक्षण प्रवाहात रमले आहेत. पंचायतसमितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीटयांच्या संकल्पनेनुसार गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी शिक्षक, पालक, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना बरोबर घेऊन इंदापूर लर्न फ्रॉम होम हा अभिनव पॅटर्न तयार केला. खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषद सदस्याअंकिता हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सभापती पुष्पा रेडके यांनी परीट, बामणे व शिक्षकांचे कौतुक केले. 

पुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस

कोरोनामुळे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे तालुक्‍यात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मार्च महिन्यापासून ऑनलाइन टेस्ट, शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा व कार्यशाळा उपक्रम पार पडले. यशस्वी शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून ऑनलाइन बक्षीस व प्रशस्ती पत्रक देण्यात आले. याअंतर्गत 99 शिक्षकांनी 900 पेक्षा जास्त तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून 50 पेक्षा अधिक व्हिडिओ तयार केलेल्या सतीश भोंग, श्रीमती इशरत मोमीन, ज्योती गायकवाड, शुभांगी वारे, नुसरत सय्यद आदी शिक्षकांचे पंचायत समितीने विशेष अभिनंदन केले.

पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका 

त्यानंतर जून महिन्यापासून ऑनलाइन शिक्षण उपक्रमाव्दारे साप्ताहिक अभ्यासाच्या स्मार्ट पीडीएफ व ऑनलाइन चाचण्या नियमितसुरू असून आत्तापर्यंत पहिली ते सातवीइयत्तांच्या 85 हजार विद्यार्थ्यांनी साप्ताहिक चाचणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. 
ऑनलाइन शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याची प्रतिक्रिया इंदापूर तालुका व्हिडिओ निर्मिती मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती इशरत मोमीन यांनी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

2868 विद्यार्थ्यांना अभ्यासापुरता स्मार्टफोन 
ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षकांची झूम व गूगल मीट वापर प्रशिक्षण यशस्वी झाल्याने शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पोहोचले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, अशा 2868 विद्यार्थ्यांना स्मार्टफोन स्वयंसेवक स्मार्टफोन अभ्यासापुरता उपलब्ध करून देत असल्याने हा पल्ला यशस्वी झाला. उर्वरित 8 हजार विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती परीट व बामणे यांनी दिली. 

loading image