ध्वनिक्षेपकाबाबत कायद्यानुसार कार्यवाही करु

मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींचा पुण्यातील बैठकीतील सूर
loudspeakers
loudspeakers esakal

पुणे : धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत, आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्यांतील तरतुदींनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना याबाबतच्या अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन- मदत करण्याची आमची भूमिका आहे, असा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींच्या बैठकीत गुरुवारी उमटला.

अवामी महाझ ' सामाजिक संघटनेने ही बैठक बोलवली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अवामी महाजचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते. रिपब्लिकन पक्षाचे अॅड. अयूब शेख, नुरुद्दीन सोमजी, अवामी महाझ सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी आदी या प्रसंगी उपस्थित होते. आवाजाची मर्यादा प्रमाणात ठेवण्याबाबत कायद्याच्या तरतूदी प्रमाण मानल्या जातील, असे अनेक प्रतिनिधींनी सांगितले.

डॉ. इनामदार म्हणाले, ‘‘पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक परवानगी संबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवानगी आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर धर्माच्या धर्म स्थळांना देखील ध्वनीक्षेपक परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेत मदत करू. निवडणूका असल्या मुळे त्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असले तरी शांतता, सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची भूमिका आहे.’’ इक्बाल शेख,मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण,अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी,असलम बागवान यांच्यासह अनेक प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते.

शहरात कायद्याच्या चौकटीत राहुन अजान ध्वनिक्षेपकावरूनच दिली जाईल अशी भुमिका पुण्यातील मुस्लिम संघटनांनी घेतली आहे. अजान एक ते दीड मिनिटांची असते. न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० नंतर अजानसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. मंदिरात देखील रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. मंदिरांसाठीही याच कायद्याचे पालन करण्याची पोलिसांची सूचना आहे. आवाजाच्या मर्यादेबाबत कायदा पाळण्याची भुमिका असेल. हनुमान चालिसाबाबत जे काही करायचं ते पोलिस करतील. कमीत कमी वेळेत अजान पूर्ण करा, अशा सूचना दिल्या आहेत. नियमानुसार आम्ही भोंगे ठेवणार आहोत. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही अजान देऊ, असेही यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com