अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध होणार कायदेशीर कारवाई : पोलिस आयुक्त

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

 "सध्या विविध जिल्ह्यात पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना चुकीची खोटी माहिती पसरवली जात आहे. या माहितीमुळे नागरिकामध्ये भय निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल." असे पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, यांनी आवाहन केले आहे.

पुणे : "सध्या विविध जिल्ह्यात पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना चुकीची खोटी माहिती पसरवली जात आहे. या माहितीमुळे नागरिकामध्ये भय निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल." असे पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, यांनी आवाहन केले आहे. त्यांनी याबाबत सर्व शहरातील पोलिस अधिकाऱ्यांना हा मेसेज पाठविला असून त्यांनी हा मेसेज नागरिकांपर्यंत पोहचवून यावर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे  अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे व राज्यभरातील इतर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या, नाले व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. परंतु या काळात धरण तुटलेले, रस्ता खराब झाला आणि पूल कोसळले, बंधाऱ्याला तडे गेले या सारख्या अफवा पसरविणारे काही संदेश पसरविले जात आहेत. शाळा कॉलेज, कंपन्याना सुट्टी दिल्याचसंदेश पसरविला जात आहे. सर्वांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आवश्यक माहिती व मदतीसाठी पोलिस कंट्रोल रूम (020 261 26296) आणि पुणे पोलिस व्हॉट्स अॅप 8975283100 वर संपर्क साधता येईल. असे ही आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी कळविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legal action will be taken against spreading rumors said the police commissioner. K Venkatesham