अधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी पैसे देऊन होर्डिंगवर लावलेल्या जाहिरातींवरच या शुभेच्छा चिकटवल्या जातात. त्या बदल्यात आम्हाला रुपयाही दिला जात नाही. तर फलक लावण्याआधी साधे विचारलेही जात नाही. या राजकीय अतिक्रमणांपासून आम्हाला वाचवा...ही मागणी आहे होर्डिंग व्यावसायिकांच्या पुणे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची.

राजकीय प्रतिनिधींकडून होणाऱ्या दमदाटीचा पाढा ‘सकाळ’मध्ये झालेल्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांनी वाचला. 

शहरातील माननीयांचा वाढदिवस, सणांच्या शुभेच्छांसाठी राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते चौकाचौकांत  होर्डिंगचा वापर करतात. त्यांच्या विरोधात तक्रार केली, तर कार्यकर्त्यांकडून दमदाटी केली जाते, अशा समस्या होर्डिंग मालकांना येत आहेत. बैठकीस अध्यक्ष बाळासाहेब गांजवे, चंद्रकांत कुडाळ आणि विजयकुमार गोखले उपस्थित होते.

असोसिएशनच्या मागण्या
    होर्डिंगवर पुढाऱ्यांच्या पोस्टरला बंदी घालण्यात यावी
    बेकायदेशीर फ्लेक्‍स लावणाऱ्या पुढाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी
    महापालिकेस भरलेल्या शुल्काची नोंद परवान्यावर केली जावी
    वीज दर आकार कमी करावा

शहरातील व्यावसायिक - १५०
शहरात अधिकृत होर्डिंग - १८८०

जाहिरात फलकासाठी महापालिकेस ८२ रुपये प्रतिचौरस फुटाप्रमाणे शुल्क भरत होतो. मात्र, २०१३ पासून महापालिकेने फलकासाठी प्रतिचौरस फूट २२२ रुपये शुल्क आकारणे सुरू केले. प्रत्यक्षात हा ठराव डिसेंबर २०१८ मध्ये संमत झाला. त्यामुळे २०१३ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत भरलेली जादा रक्कम आम्हाला परत मिळावी. 
- बाळासाहेब गांजवे,अध्यक्ष, ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन 

Web Title: legal Hording Advertising Pune Advertising Association