लेण्याद्रीला लेण्या खुल्या झाल्याने गणेशभक्तांना मुखदर्शनाचा लाभ

पुरातत्व विभागाने श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथील लेण्या पर्यटकांसाठी खुल्या केल्याने गणेश भक्तांना शुक्रवार ता.२४ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश लेणीतील श्री गिरीजात्मज गणेशाचे बाहेरुन मुख दर्शनाचा लाभ घेता आला.
Lenyadri Ganpati
Lenyadri GanpatiSakal

जुन्नर - पुरातत्व विभागाने श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील लेण्या पर्यटकांसाठी खुल्या केल्याने गणेश भक्तांना शुक्रवार ता.२४ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश लेणीतील श्री गिरीजात्मज गणेशाचे बाहेरुन मुख दर्शनाचा लाभ घेता आला.

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते 'श्रीं'चा अभिषेक व महापूजा झाली.यावेळी उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई,खजिनदार काशिनाथ लोखंडे उपस्थित होते.

Lenyadri Ganpati
ओशोंच्या आश्रमात घोटाळा? अनुयायांनी घेतली रामदास आठवलेंची भेट

चतुर्थीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी श्री गिरीजात्मजास साकडे घालण्यात आले.दिवसभरात पुणे,अहमदनगर,नाशिक, ठाणे व इतर ठिकाणाहुन आलेल्या गणेश भक्तांनी श्रींचे मुख-दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com