

Divine Celebrations at Lenyadri: Thousands Throng Girijatmaj Temple on Angarki Chaturthi
Sakal
जुन्नर : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र लेण्याद्री येथे ‘श्री गणेश महायाग’ संपन्न झाला. तर चतुर्थी निमित्ताने हजारो भाविकांनी श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शन घेतले. यानिमित्ताने ‘श्री गिरीजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.