आपण गोडधोड खातोय ही सल मनाला शांत बसू देत नव्हती मग...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

ज्यांना घर नाही, रस्त्यावर राहून गुजरान करतात अशा नागरिकांना, विशेषतः छोटी मुले, महिला यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोथरुड, कर्वे पुतळा चौक, एरंडवणे, महाराणा प्रताप उद्यान आदी भागातील गरजवंतांना वाटप करण्यात आले.

कोथरुड (पुणे) : ज्यांना घर नाही, रस्त्यावर राहून गुजरान करतात अशा नागरिकांना, विशेषतः छोटी मुले, महिला यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोथरुड, कर्वे पुतळा चौक, एरंडवणे, महाराणा प्रताप उद्यान आदी भागातील गरजवंतांना वाटप करण्यात आले. लायन चंद्रहास शेटी, क्षमा गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जय मैड, यश खंडागळे, शंतनू गोयल, यश मैड, करण पाटील, सूरज बांगड, आशिष पेमराजू, शिवा फुलारी आदीं युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. लायन यश पंडीत, सतिश राजहंस, दत्ता शृंगारे आदींचे सहकार्य लाभले.

हेही वाचा- अष्टविनायक महागणपतीचे मंदिर उघडलं; नियमांचे पालन करण्याचं आवाहन

करण पाटील लिओ म्हणाले की, आपले बांधव उपाशी असताना आपण गोड धोड खातोय ही सल मनाला शांत बसू देत नव्हती. अशावेळी आमच्या लिओ क्लबचे अध्यक्ष जय मैड यांनी हा उपक्रम सुचवला. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. समाजभान जपत असल्याचे समाधान वाटत आहे.

हेही वाचा- कोरोना मृत्यूच्या कारणांचे आता "पोस्टमार्टेम';मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न

लायन शमा गोयल म्हणाल्या की, कोरोनामुळे अनेक कुटूंबे रस्त्यावर आली. आठ महिने हाल काढल्यानंतर किमान दिवाळी तरी गोड झाली पाहिजे, या भावनेतून सगळ्यांसोबत दिवाळी उपक्रम आम्ही राबवला. त्याला अनेकांचे सहकार्य लाभले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Leo Club in Kothrud has distributed Diwali faralas to people living on the streets