बिबट्याच्या हल्ल्यात राजुरीत ३ कालवडी ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

आळेफाटा - राजुरी (ता. जुन्नर) येथे आज पहाटे गोगडीमळा (दुर्गामातानगर) परिसरात सखाराम किसन औटी यांच्या गोठ्यातील एकूण तीन कालवडी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या.

जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी, बेल्हे, साकोरी, मंगरूळ आदी गावांत बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचे पाळीव जनावरांवरील हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, ऊसतोडणी सुरू असल्याने बिबटे सैरभैर झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी बेल्हे येथील आरोटेमळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या.

तसेच राजुरी परिसरातही काही पाळीव जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत. त्यानंतर आज पुन्हा सखाराम औटी यांच्या तीन कालवडी बिबट्याने ठार केल्या. बिबट्याने गोठ्याच्या कंपाउंडच्या तारा तोडून आत प्रवेश करून एकूण ३ कालवडी गोठ्याबाहेर ओढत नेऊन ठार केल्याचे सांगण्यात आले. यामुळे औटी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: Leopard Attack