बिबट्याचा मोटरसायकलवर हल्ला, दोन जखमी

दत्ता म्हसकर
बुधवार, 2 मे 2018

जुन्नर (पुणे) : हिवरे खुर्द ता. जुन्नर येथे मंगळवारी (ता.1) सायंकाळी साडेसात वाजता बिबट्याने चालत्या मोटारसायकल वर हल्ला केला.

बिबट्याच्या अचानक हल्ल्याने घाबरून गेल्याने मोटार सायकल चालक प्रसाद अंकुश कवडे व त्याची आई सुरेखा दोघेही गाडीवरून पडले व गंभीर जखमी झाले.

बिबट्याने मात्र अपघात झाल्यानंतर  तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून सांयकाळी मोटारसायकलवरून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. सर्रास होणाऱ्या हल्ल्यांमुळे या परिसरातील बिबट्यांना पकडण्याची मागणी होत आहे.     

Web Title: leopard attack on bike 2 injured