

Otur leopard attack news
sakal
ओतूर : नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पारपडल्या असून निवडणूकीच्या धामधुमीत प्रचाराच्या गाड्यांच्या आवाजाने बिबट्या नागरिकांन व लोकवस्ती पासून लांब पळून जात होता.त्यामुळे बिबट बाबत कोणतीही घटना घडताना आढळून येत नव्हती.मात्र निवडणूक संपली आणि दैनंदिन जीवन सुरू झाले आहे.शेती पिकवण्यासाठी कायम संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांवर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने ओतूर (ता.जुन्नर) व परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत परत वाढु लागली आहे.