राहू : दहिटणे (ता. दौंड) येथे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आई शेजारी झोपलेल्या अकरा महिन्याच्या बाळावर हल्ला करत बिबट्याने (Leopard Attack) त्याला उसाच्या शेतात नेत धूम ठोकली. सात तासाच्या प्रतीक्षेनंतर अद्याप कोणतेही धागेदोरे वन विभागाच्या (Forest Department) हाती लागले नाहीत. उसाच्या वाढलेल्या क्षेत्रात लहान बाळाला शोधण्याचे काम वनपरिक्षेत्र विभाग, रेस्क्यू टीम, श्वानपथक करत आहे.