

Ambegaon Leopard Attack Farmer Escapes Safely After Leopard Jumps From Sugarcane Field Forest Department Installs Cage
sakal
-नवनाथ भेके
निरगुडसर: उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकी वर जात असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बिबट्याचा हल्ला चुकवला आणि आरडाओरडा करत जवळच असलेल्या घराचा आसरा घेतला त्यानंतर बिबट्याने जवळ असलेल्या शेतात धूम ठोकली.