
Leopard Attack
Sakal
निरगुडसर : येथून बुधवारी रात्री साडेअकरा वाजता मंचर याठिकाणी दोन युवक दुचाकी वरून कामावर जात असताना मंचर-निरगुडसर रस्त्यावर पिंपळगावानजीक बिबट्याने दुचाकीवर झेप घेत हल्ला केला. यामध्ये सुनील शिंदे (पांढरीवस्ती-खडकी) हा युवक जखमी झाला आहे. खडकी- पांढरीवस्ती येथील योगेश रमेश पोखरकर व सुनिल विठ्ठल शिंदे हे दोघे जण पांढरीवस्ती येथून बुधवार (ता. ०८) रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास मोरडे फूड कंपनी मंचर येथे कामावर जात होते.