
Leopard Attack
Sakal
मंचर : पिंपरखेड (ता.शिरूर) येथे रविवारी (ता.१२) सकाळी पावणे दहाच्या सुमारास बिबट्याने केलेला हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय साडेपाच) ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. कुटुंबियांनी तातडीने तिला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले असतानाच तिचा उपचार सुविधा मिळण्यापूर्वीच सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षात पिंपरखेड व जांबुत या पाच किलोमीटर अंतरामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या ५० हून अधिक आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.