भाऊबीजेसाठी निघालेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला !

Leopard
Leopard

आळेफाटा - निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (ता.२९) रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर मागे बसून भाऊबीजेसाठी निघालेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी संबंधित महिलेच्या पायावर बिबट्याच्या पंजाच्या नख्या लागल्याने तसेच गाडीवरून खाली पडल्याने ती किरकोळ जखमी झाली. 

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, कमल भगवान पाबळे (वय ५०) रा. सावरगाव - बस्ती (ता. जुन्नर) ही विवाहित महिला सासरहून निमगावसावा येथे दीपावलीसाठी सुरुवातीला मावशीकडे आली. त्यानंतर निमगाव सावा येथील कारफाट्याकडून  एका नातेवाईकाच्या दुचाकीवर मावशीसमवेत माहेरी साकोरीकडे ट्रिपलसीट येत असताना बोऱ्हाडे वस्तीजवळ दुचाकी आली असताना, बिबट्याने बाजूच्या शेतातून मोठ्याने डरकाळी फोडून चालत्या दुचाकीवर डाव्या बाजूने झेप घेतली. यावेळी दुचाकी चालकाचा घाबरून तोल गेल्याने दुचाकी घसरून पडली. यावेळी संबंधित महिलेच्या डोक्याला जखम झाली तसेच तिच्या पायावर बिबट्याच्या नख्या लागल्याने ती किरकोळ जखमी झाली. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने तसेच दोन्ही बाजूंनी दुसऱ्या दुचाकी गाड्या येत असल्याने पडलेल्या उजेडामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान इतर दोघांना कोणतीही दुखापत झालेली नाही.  दरम्यान संबंधित महिलेवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे शिवाजी कोंडीभाऊ मुंढे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com