ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील कपर्दिकेश्वर मंदिर ते बाबीत मळा मार्गावर दुचाकीवर हल्ला करून दुचाकीवरील दाम्पंत्याला बिबट्याने जखमी केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी दिली.
संतोष बन्सीधर गिते (वय-४६) आणि योगिता संतोष गिते (वय-३९) (रा. बाबित मळा, ओतूर, ता. जुन्नर) हे असे जखमी दाम्पत्याची नावे आहे. ते शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजे दरम्यान ओतूरवरून घरी बाबीत मळा येथे जात असताना कपर्दिकेश्वर मंदिराच्या पुढे पिंपळगाव जोगा कॉर्नरवर बिबट्याने अचानक हल्ला करून यांना जखमी केले.