पुणे : औंधजवळील संरक्षण खात्याच्या परिसरात बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

यासंदर्भात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी सकाळ संध्याकाळ एकटे दुकटे न फिरण्याच्या सुचना संरक्षण विभागाच्या प्रशासनाने केल्या आहेत. नागरी वस्तीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुणे : सांगवी व औंध जवळील मुळा नदीकाठावरील संरक्षण विभागाच्या सीक्युएई या परिसरात बिबट्या आढळून आल्याने प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.

याविषयी सुरक्षा अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सर्व नागरिक व संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी एकटे न फिरण्याची सुचना केली आहे. सोमवारी (ता.13) सकाळी या परिसरातील सिसिटिव्हीमध्ये या भागात बिबट्या फिरताना चित्रित झाल्याचा पुरावा मिळाला आहे.

यासंदर्भात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी सकाळ संध्याकाळ एकटे दुकटे न फिरण्याच्या सुचना संरक्षण विभागाच्या प्रशासनाने केल्या आहेत. नागरी वस्तीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: leopard in Aundh area at Pune