भंडारा डोंगराच्या पायथ्याला बिबट्या?

Leopard
Leopard

इंदोरी - भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळील दत्तात्रेय काळे यांच्या शेतात मेंढ्यांच्या कळपातील गिरगाईचे वासरू बिबट्याने ठार केले. शनिवारी सांयकाळी ही घटना घडली.

डोंगराच्या पायथ्याला मेंढपाळानी आपला पाडा लावला होता. त्या वेळी मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढपाळाने चार घोडे, दोन गाई आणि वासरू बांधले होते. सातच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यात त्याने वासराला फस्त केले. हल्ला झाल्याचे कळताच तेथे जवळ असलेले अमृता कऱ्हे, सहादू काळे, तुकाराम काळे व कांताराम देशमुख यांनी एकाच वेळी काठ्या घेऊन बिबट्याच्या अंगावर धावले. त्यामुळे तो उसाच्या शेतात पळून गेला. 

कऱ्हे यांनी ही घटना वडगाव मावळ वनक्षेत्रपाल कार्यालयास कळविल्यानंतर रविवारी काळूराम कड व कोंडिबा जांभूळकर हे घटनास्थळी आले. त्यांनी पाहणी केली. बिबट्याच्या पावलांचे ठसे घेतले. पंचनामा करून ठसे प्रयोगशाळेत पाठविले. आता त्याच्या अहवालानंतरच बिबट्याबाबतची नेमकी माहिती समोर येईल. पावलांचे ठसे हे बिबट्याचेच असावेत, असा अंदाज कर्मचारी कड यांनी व्यक्त केला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच परिसरात बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी अमृता कऱ्हे यांचे घोड्याचे शिंगरू सांगुर्डीच्या शिवारात बिबट्यानेच ठार केले होते. शुक्रवारी (ता. १) भंडारा पायथ्याशी असलेल्या गणेश पिंजण यांच्या वासरावरही हल्ला झाला होता. तेही बिबट्यानेच ठार केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com