बाँब लावा; बिबट्याला पळवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

जुन्नर - बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणाऱ्यांना फटाक्‍यातील सुतळी बाँब देऊन हे वाजवा म्हणजे बिबट्या पळून जाईल, असा सल्ला वनविभागाचे कर्मचारी देत आहेत.

भरदिवसा घराच्या बाहेर पायऱ्यांवर, तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणाऱ्या एक बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे (ता. जुन्नर) येथे गेल्या काही महिन्यांपासून दहशत असल्याचे माजी सरपंच ऊर्मिला बोडके यांनी सांगितले. कधी दिवसा, तर कधी सांयकाळी त्यांचा वावर वाढला आहे.

परिसरातील अनेक पाळीव प्राणी व भटक्‍या कुत्र्यांचा त्यांनी फडशा पाडला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने या बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे वन खात्याने लक्ष दिले नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी बोडके यांच्या घराच्या कुंपणावरून बिबट्या आला. या वेळी त्यांनी टॉर्चचा उजेड दाखवून त्यास पळवून लावले. ही बाब वनविभागास वळविण्यासाठी जुन्नर गाठले. पण साहेबची भेट झाली नाही. अखेर फोन केला तेव्हा एक कर्मचारी फटाक्‍यांचे बॉक्‍स घेऊन आला व वाजविण्याचा सल्ला देऊन निघून गेला. 

दरम्यान, या बिबट्याचे बछडे मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांना जेरबंद करण्याची मागणी बोडके यांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title: leopard bomb forest officer