
महाळुंगे पडवळ : चास (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडीत हल्ला करणारा बिबट्या बुधवारी (ता.२५) पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. तो गेली दोन दिवस पिंजऱ्याला हुलकावणी देत होता. बिबट्या जेरबंद झाल्याने गणेशवाडीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.