esakal | बिबट्याच्या जीवनशैलीचे उलगडणार कंगोरे
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

बिबट्या व मानव संघर्षाच्या घटना नेहमीच घडत असतात. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर वारंवार बिबट्या शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करत असतो. यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे वनविभागातर्फे कोणत्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे.

बिबट्याच्या जीवनशैलीचे उलगडणार कंगोरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जुन्नर - बिबट्या व मानव संघर्षाच्या घटना नेहमीच घडत असतात. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर वारंवार बिबट्या शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करत असतो. यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे वनविभागातर्फे कोणत्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे हे समजण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अत्याधुनिक गणनेस मंचर (ता.आंबेगाव) वनपरिक्षेत्रातून सुरुवात केल्याची माहिती उपवनसंरक्षक जयरामे गौडा व सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांनी दिली.

मंचर वनपरिक्षेत्रातील चिंचोडी, नारोडी, चास, महाळूगे पडवळ, साकोरे, कळंब, नांदूर, लौकी, चांडोली बुद्रुक, पिंपळगाव खडकी, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव काशीबेग या तेरा गावातील बिबट्याचा संभाव्य वावर असणाऱ्या ४५ ठिकाणी प्रत्येकी दोन कॅमेरे एक महिनाभर लावले आहेत. डेहराडूनच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यू.आय.आय) कडून ही गणना आणि संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या गणनेसाठी १०० ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत असून, सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. यामुळे बिबट्यांचे जीवन शैलीचे विविध पैलू देखील समजण्यास मदत होणार आहे. डब्ल्यू.आय.आय.चे प्रमुख संशोधन शास्त्रज्ञ डॉ.हबीब बिलाल यांच्या नेतृत्वाखाली दोन प्रकल्प काम करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणनेसाठी तीन कोटी रुपये उपलब्ध 
गणनेच्या प्रकल्पासाठी सरकारच्या कॅम्पा योजनेतून तीन कोटी रुपये उपलब्ध झाले असून, हा प्रकल्प तीन वर्षे सुरू राहणार आहे. घोड प्रकल्प वन विभागात जुन्नरच्या कार्यक्षेत्रात शिरूर, खेड व आंबेगाव या तालुक्यांचा समावेश होतो. या चारही तालुक्यात बिबट्यांचा वेगवेगळ्या गावात वावर आहे.

जुन्नर तालुक्यात ४५ ठिकाणच्या सुमारे १०० स्केअर किलोमीटरमधील बिबट तसेच अन्य वन्य प्राण्यांची छायाचित्रे मिळणार आहेत. बिबट्याबरोबर इतर प्राण्यांची देखील नोंद होणार आहे. पहिल्या टप्प्यातील तेरा गावात सुमारे एक महिना कॅमेरे लावले होते. आता अन्य गावात लावण्यात येणार आहेत.
- अजित शिंदे,  मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी

सिंहगड परिसर सुन्न:दोन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या, नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक

याची ठेवली जाणार नोंद
१. जुन्नर वनविभागातील बिबट्यांची संख्या
२. बिबट्यांच्या अधिवासाचे ठिकाणे
३. जीवनशैलीचे उलगडणार विविध कंगोरे 
४. ट्रॅप कॅमेऱ्यातून बिबट्यांच्या हालचाली टिपणार
५. शरीरावरील ठिपके, रचनांकित प्रकाराची नोंद 
६. कोणत्या परिसरात अधिक वास्तव्य करतो
७. एकूण किती परिघात भटकंती असते 
८. बिबटे डोंगरावर राहणे पसंत करतात की शेतात

घोड प्रकल्प जुन्नर वनविभागातील
तीन वर्षात आजपर्यंत ६८ बिबट्यांचा मृत्यू ३७ नर, ३१ मादी

  • १६ - रस्ते अपघातात  
  • ३३ - विहिरीत पडून   
  • १९ - नैसर्गिक मृत्यू 
  • २४ बिबट्यांना जेरबंद करून सोडून दिले आहे.

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी होणार फायदा
जुन्नर वनविभागाच्या परिक्षेत्राबाहेरून काही बिबटे या भागात येतात का? याचीही माहिती या प्रकल्पातून मिळण्यास 
मदत होणार आहे. बिबट्या व्यवस्थापनासाठी या शास्त्रीय अभ्यासातून येणारे निष्कर्ष डब्ल्यू.आय.आय कडून शासनाला देणार आहेत. त्यातून 
बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना, धोरणे ठरविताना या अभ्यासात्मक निष्कर्षांचा मोठा फायदा होणार आहे.

असा आहे संशोधन प्रकल्प

  • गणना आंबेगाव तालुक्यातून सुरू 
  • टप्प्याटप्प्याने सर्व तालुक्यांतील गणना, संशोधन 
  • गणनेचा तपशील माहितीसह चार वर्षांत संकलित होणार 
  • एका वेळी १०० चौरस किलोमीटर अंतरात १०० ट्रॅप कॅमेरे 
  • सॉफ्टवेअरद्वारे महिनाभरातील निरीक्षण नोदींचे संकलन 

Edited By - Prashant Patil