leopard cub found
sakal
तळेगाव ढमढेरे - टाकळी भीमा (ता.शिरूर) गलांडेवस्ती येथील शेतकरी किसन भुजबळ यांच्या ऊस तोडणीच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने ऊस तोडणी कामगारांची धावपळ झाली. वनविभाग, रेस्क्यू टीम व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने या शेतातील बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.