बिबट्याची ‘चिकन पार्टी’,  १६० गावठी कोंबड्या केल्या फस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 20 February 2021

खामगाव येथील शेतकरी संदीप घोलप यांची शेतावर गावठी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. पोल्ट्रीच्या लोखंडी दरवाजामधून बिबट्याने पोल्ट्रीमध्ये प्रवेश केला व १६० कोबड्यांचा फडशा पाडला.

आपटाळे: खामगाव (ता. जुन्नर) येथील संदीप रामदास घोलप या शेतकऱ्याच्या १६० गावठी कोंबड्या बिबट्याने फस्त केल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

खामगाव येथील शेतकरी संदीप घोलप यांची शेतावर गावठी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. पोल्ट्रीच्या लोखंडी दरवाजामधून बिबट्याने पोल्ट्रीमध्ये प्रवेश केला व १६० कोबड्यांचा फडशा पाडला.घोलप हे सकाळी पोल्ट्रीवर गेल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनतर त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली. वनविभागाचे वनपाल शिवाजी सोनवणे व वनरक्षक दशरथ डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आणखी वाचा - पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार

खामगाव व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा. तसेच, शेतकरी संदीप घोलप यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी केली आहे. 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard eat 160 chickens in Khamgav