वनविभागाच्या जाळीतून कोयाळीत बिबट्या पसार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

भानोबाची कोयाळी (ता. खेड) गावात वनविभागाच्या जाळ्यात बिबट्या अडकला, मात्र जाळीला असलेल्या छिद्रातून तो पसरा होण्यात यशस्वी झाला. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

चाकण - भानोबाची कोयाळी (ता. खेड) गावात वनविभागाच्या जाळ्यात बिबट्या अडकला, मात्र जाळीला असलेल्या छिद्रातून तो पसरा होण्यात यशस्वी झाला. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

एका घराजवळील बाभळीच्या झाडावर रात्री दोनच्या सुमारास कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या लपून बसला होता. उपसरपंच विठ्ठल कोळेकर यांच्या घराजवळ बिबट्या झाडावर चढला होता. सकाळी आठच्या सुमारास वनविभागाने बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्‍शन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याने ते हुकविले. झाडावरून उतरून तो वनविभागाच्या जाळीत न अडकता तो उसाच्या शेतात पसार झाला. बिबट्या झाडावर असताना गावातील लोकांनी झाडाला गराडा घातला होता. त्यामुळे बिबट्या झाडावरून खाली उतरत नव्हता. काही वेळाने लोकांच्या ओरडण्याने बिबट्या झाडावरून खाली उतरला. वनविभागाच्या जाळीत तो अडकला नाही. जाळीला असलेल्या छिद्रातून बिबट्याने धूम ठोकली.

कोयाळीतील बिबट्याची सुटका करण्यासाठी माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्रातील रेस्क्‍यू टीम पोहचण्यापूर्वी बिबट्याने स्वतः सुटका करून घेतली. तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप गेला, ही चांगलीच बाब आहे. झाडावरून खाली आल्यानंतर त्याने कोणावरही हल्ला केला नाही. तसेच त्यास भुलीचे इंजेक्‍शन देण्याची वेळ आली नाही, यात तो खाली पडून जखमी होण्याची शक्‍यता होती तीही टळली.
- डॉ. अजय देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी, बिबट निवारा केंद्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard escaped in forest department nest at koyali village