

Leopard Female Trapped in Ranjani After Ten Days Farmers Relieved as Forest Department Captures the Leopard
esakal
-नवनाथ भेके
निरगुडसर: वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याला दहा दिवस हुलकावणी देणारी बिबट मादी अखेर जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावाच्या दक्षिणेला असलेल्या वाकोबा मळा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार ते पाच वर्षाची बिबट मादी जेरबंद झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.